Nilesh Saheb

आमदार श्री. निलेश नारायणराव राणे महाराष्ट्र विधानसभेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी , 15 व्या लोकसभेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले असून, गेली सुमारे 25 वर्ष ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत .

कार्यकर्त्यांविषयी प्रचंड जिव्हाळा असणारे नेतृत्व अशी त्यांची ख्याती असून पायाभूत सुविधेसह शाश्वत विकास , कोकणातील पर्यटन आणि तरुणांमधील उद्योजकता वाढवणे यावर त्यांचा विशेष भर असतो.

आपल्या लोकसभा कार्यकाळात त्यांनी मुंबई गोवा महामार्ग , कोकण रेल्वे , पर्यटन , आंबा काजू बागायतदार यांचे प्रश्न, अशी अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लावायचा प्रयत्न केला, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केली.

मुंबई येथे 17 मार्च 1981 मध्ये जन्मलेल्या निलेश नारायणराव राणे यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचे वडील श्री. नारायणराव राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून , पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे , त्याचे धाकटे बंधू आमदार श्री. नितेश नारायणराव राणे हे कणकवली विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असून, महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत.